डीएनए एडिटिंगमध्ये नीतीनियमांचे प्रश्न

0

वॉशिंग्टन: डीएनए मध्ये रोगांपासून सुटका मिळविण्यासाठी बदल केला तर ठीक पण पालकांना हवा तसे मूल जन्माला यावे म्हणून सर्वंकष बदल करण्याची घाई करू नये, असे अनेक अनुवंश वैज्ञानिकांना वाटत आहे. त्यांच्या मते हे नैतिकदृष्ट्या योग्य की अयोग्य यावर अजुनही जागतिक स्तरावर चर्चा झालेली नाही. द अमेरिकन जर्नल ऑफ ह्यूमन जेनेटिक्स या जर्नलमध्ये याची चर्चा करण्यात आलेली आहे. ब्रिटन, आशियातील अनेक अनुवंशविज्ञान तज्ज्ञांनी त्याला पाठिंबा दर्शविला आहे.

अमेरिकेत प्रयोगांवर बंदी….
अमेरिकेत हृदय रोगाचे उच्चाटन करण्यासाठी गर्भाच्या डीएनएमध्ये बदल करण्यात आले. ते यशस्वीही झाले मात्र हा गर्भ नंतर काही दिवसांनी नष्ट करण्यात आला. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या जीन एडिटिंगच्या या प्रयोगांवर सरकारने बंदी घातलेली आहे.