फैजपूर। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना विद्यापीठबाबतीत एकाच छताखाली सुविधा मिळण्याच्या दृष्टीने धनाजीनाना महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत विद्यार्थी सुविधा केंद्राचे उद्घाटन कुलगुरू प्रा.डॉ. पी.पी. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तापी परिसर विद्यामंडळ अध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी होते.
यावेळी व्यासपीठावर तापी परिसर विद्यामंडळ चेअरमन लीलाधर चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा.के.आर. चौधरी, सदस्य प्रा.पी.एच. राणे, लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.आर. पाटील, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य आर.एल.चौधरी, उमवि सुविधा केंद्राचे समन्वयक विनोद पाटील, प्राचार्य डॉ जयश्री नेमाडे, उपप्राचार्य उदय जगताप, प्रा.डि.बी. तायडे, प्रा.डॉ.ए.आय. भंगाळे, प्रा.अनिल सरोदे, प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.आर.राजपूत यांनी केले.
अडचणींचे केले निराकरण
विद्यापीठाबाबतीत विद्यार्थ्यांच्या काय कायअडचणी आहे, याबाबत कुलगुरू यांनी आपल्या समस्या काय आहे. याबाबत उपस्थित विद्यार्थ्याशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी कुलगुरू यांना आपल्या अडचणी सांगितल्या, तर यावेळी कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांनी विद्यार्थ्याच्या अडचणीची दखल घेत त्यांचे निराकरण केले. धनाजीनाना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर. चौधरी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहे याबाबत त्याचे त्यांनी
निराकरण केले.