डीएम -3 ईमारतीस स्वच्छ आणि सुंदर इमारतीचा प्रथम पुरस्कार

0

दीपनगर वसाहतीमध्ये पर्यावरणपूरक स्वच्छता स्पर्धा उत्साहात

भुसावळ- दीपनगरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. दीपनगर वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत ‘स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इमारत’ स्पर्धा घेण्यात आली. वसाहतीमधील ईमारती स्वच्छ रहाव्यात, पर्यावरणपूरक कामांची कर्मचार्‍यांमध्ये आवड निर्माण व्हावी या उद्देश्याने मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यासाठी अधीक्षक अभियंता एम.बी.पेटकर यांच्या अधिपत्याखाली एका समितीची देखील निवड करण्यात आली. या समितीने सर्व इमारतींना भेटी देवून इमारतीची अंतर्बाह्य तपासणी करून त्यांना गुण दिले तर प्रथम पुरस्कार डीएम 3 ईमारतीला द्वितीय डीएम 4 व तृतीय पुरस्कार ईएम – 72 या ईमारतीला देण्यात आला. उत्तेजनार्थ पुरस्कार सीएम -2 आणि डीएम -6 या ईमारतींना देण्यात आला. मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी पुरस्कार प्राप्त इमारतवासीयांचा विशेषतः महिला वर्ग आणि बालकांचा गौरव केला.

ईमारती व सेक्टर स्वच्छ ठेवणे जवाबदारी
आपल्या वसाहतीमधील सर्व इमारती आणि सेक्टर हे स्वच्छ आणि सुंदर असावयास हवे, अशी भावना मुख्य अभियंता बावस्कर यांनी व्यक्त केली. व्यवस्थापन त्यासाठी आपली जबाबदारी पार पाडणार असलेतरी ही वसाहत, ईमारत माझी आहे, हे सेक्टर माझे आहे ही भावना जोपासणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अधिक्षक अभियंता एम.बी.पेटकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली उन्मेष गिरगावकर, मनोहर पाचपांडे, श्रीचंद राठोड, सुरेंद्र यावले, योगेश खाडे यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.