डीएसकेंच्या 10 आलिशान गाड्या जप्त

0

जामीनअर्जावर आज सुनावणी

पुणे : सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या गेल्या दोन दिवसांत 10 अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात इनोव्हा, इटीओस, कोरोला, क्वालिस अशा गाड्यांचा समावेश आहे. डीएसके हे सद्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, डीएसके यांच्या जामिनाबाबत न्यायालयात 31 मार्चरोजी सुनावणी होणार आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी सांगितले, की डीएसके यांच्या मालकीच्या पाच इनोव्हा, दोन इटीओस, एक कोरोला, एक क्वालिस, एक सेंट्रो या दोन दिवसांच्या कालावधीत जप्त करण्यात आल्या आहे. यापूर्वी गेल्या महिन्यांत 26 फेब्रुवारीरोजी दोन बीएमडब्ल्यू, दोन टॉयोटा कॅमरी, एक पोर्श, एक एमव्ही ऑगस्टा, एक ऑडी क्यू-5 या परदेशी बनावटीच्या पाच कोटी रुपये किमतीच्या कार जप्त करण्यात आल्या होत्या. ठेवीदारांच्या मुदतठेवची रक्कम परत न केल्याबद्दल अडचणीत आलेले डीएसके यांच्याकडून दोन दिवसांत मिळून दहा गाड्या जप्त केल्या गेल्या आहेत.