डीएसके प्रकरणी महाराष्ट्र बँकेचे रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर

0

पुणे-महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रविंद्र मराठे यांना जामीन मंजूर झाला आहे. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अॅडव्होकेट चंद्रकांत बीडकर यांनी ठेवीदारांच्या वतीने मराठेंच्या जामीनाला विरोध करणारा अर्ज कोर्टात दाखल केला आहे. बीडकर हे सुद्धा ठेवीदार आहेत. त्यांच्या अर्जावर कोर्टाने सरकारी पक्ष आणि मराठेंच्या वकीलांचे म्हणणे मागवले होते.

डी.एस. के घोटाळा प्रकरणी रिझर्व्ह बॅंकेचे नियम डावलून डी. एस. के च्या अनधिकृत कंपन्याना कर्ज दिल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांच्या अार्थिक गुन्हे शाखेने मराठ्यांसह सहा अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. मात्र पोलिसांनी रिझर्व्ह बॅंकेला न कळवता ही कारवाई केल्याने मराठे यांना जामीन मिळावा असे मराठे यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले.