डीजीआर कृषी केंद्राचे उद्घाटन

0

अमळनेर । तालुक्यातील गडखांब येथे सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डीजीआर कृषीमित्र केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व कृषिभुषण माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. बलराम ऑरगॅनिक मोगर जि. आणंद व डीजीआर मल्टीट्रेड प्रा.लि.अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने गावपातळीवर शेतकरी बंधूंसाठी सेंद्रिय शेतीचे महत्व, सखोल मार्गदर्शन व भारत सरकार मान्यता प्राप्त ओखा सर्टिफाईड ऑरगॅनिक मॅन्युअर बलराम गोल्ड लिक्वीड, जैविक मॅन्युअर कृषीजिवन, ग्रोथ प्रमोटर कृषीगार्ड व बायोपेस्टिसाईड, बलराम 303 फक्त या उत्पादनाव्यतिरिक्त कुठलीही रासायनिक खते, किटकनाशक, तणनाशक अगदी शेणखतही न वापरता पहिल्याच हंगामापासुन 100 टक्के सेंद्रिय शेती करून 30 ते 35 टक्के उत्पादन वाढीच्या हमीसह सेंद्रिय शेती चा प्रचार व प्रसारसाठी अभिनव उपक्रम आहे.

डीजीआर कंपनीच्या व्यवस्थापकांनी उपस्थितांना केले मार्गदर्शन
डीजीआर कंपनीचे व्यवस्थापक विजय पाटील यांनी सेंद्रिय शेती ही काळाची गरजच आहे व कशाप्रकारे आधुनिक सेंद्रिय शेती करून उत्पादन वाढ घेऊन शेती सजीव करता येईल याविषयी मार्गदर्शन केले तर कृषिभुषण साहेबराव पाटील यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व व गरज अगदी सखोल समजावून सांगितले. सेंद्रिय शेती शिवाय पर्यायच नाही. जर आज शेतकरी जागृत नाही झाले तर येणारी पिढी म्हणजे आपली नातवंडे आपल्याला कधीच माफ नाही करणार. डीजीआर कृषिमित्र चा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्याचा जरुर लाभ घ्यावा. अगदी पौराणिक उदाहरणे देउन माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सांगितले की भिम, अर्जुन, भिस्म पितामह 700 वर्षे जगले अगदी शबरी 142 वर्षे जगली आणि अगदी आपलेच वाडवाडील, आजोबा निदान 105 वर्षे निरोगी आयुष्य जगले. आणि आता या रासायनिक जहरयुक्त अन्नधान्याच्या वापरुन 40 वर्षात गेले. म्हणून शेती वाचवुन निरोगी राहण्यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. डीजीआरने तर उत्पादन झटण्याची भिती घालवून संपूर्ण व ओखा सर्टिफाईड पर्याय व मार्गदर्शन गावातच उपलब्ध करून दिले आहे. त्याचा जरुर लाभ घ्यावा.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमात निंभोरा येथील प्रयोगशील शेतकरी कृषीभुषण सुरेश पाटील ही उपलब्ध होते. त्यांनीही या अभिनव उपक्रमाची सखोल माहिती जाणुन घेतली व ड़ीजीआर कृषीमित्र लिलाधर लाला पाटील यांचे लिंबू च्या शेतातील ड़ेमोप्लाट ची पाहणी केली व प्रत्यक्ष जबरदस्त रिझल्ट अनुभवला. कार्यक्रमात नवनिर्वाचित जि.प.सदस्या मिनाताइ र्पाटील दहिवद, पं.स.सदस्य विनोद जाधव, निवृत्ती बागुल पं.स.सदस्य बापू कोळी, गडखांबचे उपसरपंच मधुकर उत्तम पाटील, डीजीआरच्या व्यावस्थापिका प्रतिभा पाटील व बरेच प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लांगडे मॅडम यांनी केले.