डीजेच्या गाण्यावरून दोन गटात हाणामारी

0

धुळे । डीजेवरील गाण्यावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शहरातील जुने धुळे भागात सोमवारी दुपारी उशिरा घडली घटनेचे गांभिर्य लक्षात घेता आझादनगर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी जमावाकरुन एका दुचाकीची तोडफोडही झाली आहे. कानुबाई मातेचा उत्सव जुने धुळे भागात उत्साहाने साजरा करण्यात आला. रविवारी प्रतिष्ठापना केल्यानंतर सोमवारी दुपारी कानुबाई मातेच्या मुर्तीची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. यावेळी डीजेचे वाद्य लावण्यात आले होते. दुसर्‍या गटाकडून मिरवणुकीत गाणे वाजविण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला. वादाचे पडसाद हाणामारीत झाल्याने तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस तातडीने दाखल झाले होते. यावेळी जमावाकडून एका दुचाकीची तोडफोड करण्यात आली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.