डीजेमुळे वाघेश्वर तरुण मंडळावर गुन्हा

0

पुणे । येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत पिकअप जीपवर डीजे लावल्याने वाघेश्वर तरुण मंडळाच्या पदाधिकार्‍यांवर कलम 188प्रमाणे बॅन्ड व डीजेचालक ख्रिस्तीवर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक एस.एस. होनमाने यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे, तर वाघेश्वर तरुण मंडळाचे संतोष तांबे, रामदास दाभाडे, अमित सातव, चैतन्य सातव, सुशील जाधव, राजेंद्र कांचन, गणेश आल्हाट, शेखर बर्डे, स्वप्नील भाडळे, प्रवीण भाडळे, अक्षय बेंडावले, प्रशांत भाडळे, प्रमोद भाडळे, लखन भाडळे, तुषार सातव, सुधीर भाडळे, जयसिंग भाडळे, राहुल दाभाडे, विनोद सातव, सागर जाधव, प्रमोद सातव, अमोल सातव, राम भाडळे, निखिल भाडळे, अजित सातव, सचिन भाडळे, शुभम कांबळे, सुखदेव भाडळे, प्रतिक तांबे, लक्ष्मी बॅन्डचालक बाबासाहेब कसबे सर्व रा. वाघोली व डीजेचालक ख्रिस्ती अ‍ॅन्थनी डिसोजा (रा. कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर डीजेचे साउंड, साहित्य व जीप जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी मंडळाचे 29 पदाधिकारी व इतर 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. उत्सव साजरा करीत असताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी मंडळांनी घेतली पाहिजे. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांची हयगय केली जाणार नसल्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले.