डीजे वाहनाची धडक, रणगावच्या इसमाचा मृत्यू

0

रावेर- भरधाव डीजेच्या वाहनाने धडक दिल्याने तालुक्यातील रणगावच्या इसमाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रामलाल चौधरी (45, रणगाव) हे उदळी रस्त्याने दुचाकी (एम.एच.19 एमव्ही.8964) जात असताना त्यांना डीजे वाहन (एम.एच.19 एस.7067) ने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी चेतन प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीनुसार डीजे वाहनाच्या चालक गफ्फार हमीद तडवी (रा.रसलपूर) विरुद्ध रात्री उशिरा सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गणेश भालेराव करीत आहेत.