डीपीडीसीच्या 36 जागांसाठी 135 अर्ज

0

जळगाव। जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. 16 ऑगस्ट ही अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. जिल्हा नियोजन समितीच्या एकुण 36 जागांसाठी 135 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात स्थानिक स्वराज्य संस्थेसह नागरी संस्थेच्या पदाधिकार्‍यांचा समावेश असतो. जिल्हा परिषदेतुन एकुण 27 जागांची निवडणूक होणार असून ही निवडणुक बिनविरोध होण्याची चिन्ह आहे.

16 ऑगस्ट होती अंतीम मुदत
यात जिल्हा परिषदेत भाजप मोठा पक्ष असल्याने आणि भाजपाची एकहाती सत्ता असल्याने त्यांना 13 जागा तर राष्ट्रवादी, शिवसेना यांना प्रत्येकी 6 तर कॉग्रेसला 2 जागा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नियोजन समितीत झेडपीतून 27 तर नगरपालिकेतून 9 सदस्य दिले जाणार आहेत. यासंबधी गटनेत्यांच्या बैठका पुर्ण झाल्या असून यात चारही पक्षांची सदस्यसंख्या निश्चित केली आहे. दरम्यान बुधवारी झालेल्या छाननीत झेडपी गटातून प्राप्त 62 पैकी एक अर्ज नामंजूर झाला आहे. यामुळे उर्वरित 61 सदस्यांमधून 27 सदस्यांची निवड करावी लागणार आहे. कॉग्रेसने चार सदस्यांमधून दोन नावे निश्चित केली आहे. जिल्हा नियोजन समितीची गेल्या वर्षभरापासून रखडलेली निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. निवडणुकीसाठी अर्ज मागविण्यात आले. जिल्ह्यातील प्रमुख पक्षांनी यात सहभाग घेतला आहे. शिवसेनेतर्फे गुलाबराव पाटील यांचे सूपुत्र प्रताप पाटील, गटनेता रावसाहेब पाटील, झेडपी सदस्य नानाभाऊ महाजन, गोपाल पाटील आदींनी अर्ज दाखल केलेला आहे.