डीपीडीसी निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल

0

जळगाव। गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. 16 ऑगस्ट निवडणुकीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

दरम्यान शिवसेनेतर्फे चार जणांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. यात सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रतपाराव पाटील, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील, नानाभाऊ महाजन, गोपाल पाटील आदींचा समावेश आहे. त्यांनी निवासी जिल्हाधिकारी राहूल मुंडके यांच्याकडे नामनिर्देशन दाखल केले.