डीलाईट बिस्कीटला कुजलेला सारखा वास

0

होळनांथे । संपूर्ण भारतभर शुद्ध व स्वदेशीच्या नावाने प्रसिद्ध पतंजलीच्या चोको डीलाईट बिस्कीट कुजलेल्या स्थितित आढळून आले.भावेर येथील भटेसिंग चौधरी यांनी होळनांथे येथील पतंजली किरकोळ विक्रीच्या दुकानातून चोको डीलाईट या क्रीमयुक्त बिस्कीटचा पुडा घेतला सदर बिस्कीट खाल्यावर कुजलेले लागले.तद्नंतर दुकानदारास सांगितल्यावर त्याने दुसरा बिस्कीटचा पुडा दिला पण तो पुडाचा देखील कुजलेला सारखा वास येत असल्याने चौधरी यांनी ग्राहक सेवा नंबरवर फोन करून तक्रार नोदवली.सदर पाकिटावर मैदा,कोलेस्त्रोल,कृत्रीम रंग इत्यादी माहिती घटक व संपूर्ण गव्हाच्या पीठापासून बनविले असल्याचे लिहिले आहे.

डीलर्स तुम्हाला कळवेल असे उत्तर
पाकिटावर असलेल्या ग्राहक सेवा नंबरवर 18001804108 वर फोन केला असता शिरपूर येथील डीलर्स तुम्हाला या संदर्भात कळवेल असे सांगण्यात आले.सदर बिस्कीटचा पुडा बांधणी दि.8 मार्च 2017 असून विक्रीची अंतिम तारीख सहा महिन्यापर्यत आहे.होळनांथे परिसरात तेलकट पदार्थांची विक्री होत असते तसेच तालुक्याभरात पाणीपुरी व फास्टफूडच्या नावाने अखाद्य पदार्थांची विक्री सरार्स सुरु आहे मात्र अन्न व भेसळ विभागाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.