पिंपरी : चेन्नई येथे झालेल्या देशभऱातील नामांकित महाविद्यालयांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरींग, मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च महाविद्यालयाला व्हर्च्युसा कंपनीने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी प्राचार्य अनुपमा पाटील, डीन प्लेसमेंट जस्मिता कौर आदी उपस्थित होते. महाविद्यालय व डी.वाय पाटील शिक्षण संस्तर्फे विद्यार्थ्यांना व प्राध्यपकांना प्रशिक्षण, थेट रोजगाराच्या संधी, संस्थे बाहेरील विद्यार्थ्यांनदेखील प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळेच हे यश महाविद्यालय संपादन करु शकले आहे.
संस्थेचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील, निवृत्त संचालक कर्नल ए. के. जोशी, संगणक विभागप्रमुख प्रतिक्षा शेवतेकर, कुलसचिव वाय. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले.