पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रातर्फे शनिवारी (दि. 23) सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत मोफत गर्भसंस्कार कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभागाच्या प्रमुख डॉ जयश्री पाटील या मार्गदर्शन करणार आहे. गर्भावस्थेत आहार कसा असावा, कसे वागावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा याबाबतीत मार्गदर्शन करण्यात येईल. या कार्यशाळेमुळे स्त्रीची गर्भिणी अवस्था, प्रसूती व प्रसूतीनंतर चा काळ हा एक सुंदर अनुभव ठरू शकतो. जन्माला येण्यापूर्वीच गर्भावस्थेत आपल्या बाळाला चांगले संस्कार करता येऊ शकतात. अधिक माहितीसाठी आयुर्वेद महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालयाने केले आहे.