डी.एस. पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

0

जळगाव येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

धरणगाव । येथील पी. आर. हायस्कूलचे उपशिक्षक तथा राष्ट्रीय छात्रसेनाचे चीफ ऑफीस डी.एस. पाटील याना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या प्रशंसनीय कार्याच्या सन्मानार्थ सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय संस्था, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल, युवा विकास फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षकवृदांचा गौरव यावेळी करण्यात आला.

मान्यवरांनी केले अभिनंदन
यानिवडीबद्दल संस्थेची अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे, सचिव डॉ. मिलींद डहाळे, संचालक अजय पगारीया, मुख्याध्यापक सुनील मिसर, उपमुख्याध्यापक बी.एन.चौधरी, पर्यवेक्षक संजय अमृतकार, डॉ.संजीवकुमार सोनवणे, पोलिस निरीक्षक बी.डी.सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.एस.पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सी.के.आबा पाटील, टी.डी.एफ.चे तालुकाध्यक्ष शरद बन्सी, जिल्हा पतसंस्थेचे संचालक व्ही.टी.पाटील, डी.एन.पाटील (नशिराबाद), नंदू पाटील (पारोळा), संदीप घुगे, खर्दे माध्य.विद्यालयाचे वाय.जी. पाटील, श्री.शिरसाठ व स्टॉफ, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.किशोर पाटील, डॉ.अरूण वळवी, प्रा.मंगल पाटील, माजी उपप्राचार्य एस.पी.पाटील, कवी वा.ना.आधळे, कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी, शिक्षक पालक संघाचे प्रसाद कासार, सागर कासार आदींनी अभिनंदन केले. तालूक्यातील शिक्षकवृद, प्राध्यापक वृंद समाजसेवी संघटना, विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी श्री.पाटील यांचे अभिनंदन केले.