डी.के.शिवकुमारांच्या अटकेविरोधात कॉंग्रेसतर्फे राज्यव्यापी निदर्शने !

0

बंगळूर: कर्नाटकातील कॉंग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले डी.के.शिवकुमार यांची ईडीमार्फत चौकशी झाली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र शिवकुमार यांना राजकीय हेतूने प्रेरीत होऊन अटक करण्यात आली असल्याचे आरोप कॉंग्रेसकडून होत आहे. भाजपकडून राजकीय हेतूने त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले असल्याचे आरोप करत आज बुधवारी कर्नाटकात राज्यव्यापी निदर्शने होत आहे. बंगळूर येथे कॉंग्रेस नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारचे निषेध केले. भाजप सरकारकडून विविध संस्थांचा गैरवापर होतो असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

डी.के.शिवकुमार यांची कार्नाकातील राजकारणात मोठे स्थान आहे. त्यांच्या अटकेने एकच खळबळ उडाली आहे.