35 हजाराच्या मुद्देमालासहित संशयित ताब्यात ; कारागृहात रवानगी
जळगाव- शहरातील धनाजी नाना महाविद्यालयाजवळ उभ्या डी.जे. म्हणून तीन एम्लिफायर असा 35 हजाराचा ऐवज लांबविल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा शनिपेठ पोलिसांनी छडा लावला असून संशयित विकास ऊर्फ विक्की चंद्रकांत साळुंके, रा. कंडारी यास मुद्देमालासह अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तीन ते चार महिन्यांपासून संशयित महाविद्यालयाजवळ भाड्याच्या खोलीत वास्तव करत होता, याच खोलीत त्याने चोरीचा मुद्देमाल लपविला होता असल्याची माहिती मिळाली आहे.
सदाशिव नगरातील मयुर रमेश सावदेकर यांच्या मालकीचे डी.जेचे वाहन रस्त्यावर उभे होते. 5 नोव्हेंबर रोजी रात्री या 407 वाहनातून तीन एम्लिफायर लांबविल्याची घटना घडली होती. नेहमीप्रमाणे सावदेकर वाहनाची तपासणी करतांना प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चार महिन्यांपासून भाड्याच्या खोलीत वास्तव्य
संशयित हा सदाशिव नगरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे, तसेच गुन्हे शोध पथकातील दिनेशसिंग पाटील, परिस जाधव, अमित बाविस्कर, अभिजित सैंदाणे, गणेश गव्हाळे, नितीन बाविस्कर, राहुल घेटे, अनिल कांबळे, राहुल पाटील, किरण वानखेडे, अखलाख शेख या पथकाने रविवारी विक्की यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, चार महिन्यांपासून तो सदाशिव नगरात भाड्याच्या खोली राहत होता, याच खोलीत त्याने चोरीचा मुद्देमाल लपविल्याची कबूली दिली. त्यानुसार पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला. या घटनेत विक्कीचा साथीदार असल्याचे समोर आले असून तोही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली आहे.
पारोळा पोलीस ठाण्यातही संशयितावर गुन्हा
विक्की पाच वर्षाचा असताना आई वारली, यानंतर आजीने सांभाळ केला, काही दिवसांपूर्वी आजीचेही निधन झाले. यानंतर विक्कीला व्यसने जडली. ते पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारीकडे वळला. त्याने कंडारी येथील घर भाड्याने दिले आहे. विकास उर्फ विक्की याच्यावर पारोळा पोलीस ठाण्यात बेकायदा गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे. शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातही पोलीस त्याला कारागृहातून ताब्यात घेण्यात येणार आहे. पुढिल तपास अमित बाविस्कर, राहुल घेटे करित आहे.