जाकीर हुसेन कॉलनीतील प्रकार ; तीघांविरोधात रामानंद पोलिसात गुन्हा ; एकाला अटक
जळगाव- नवरात्रोत्सव सुरु असून डी.जे ला बंदी आहे. असे असतांनाही जाकीर हुसेन कॉलनीत मॉ नवदुर्गा उत्सव मित्र मंडळातर्फे डी.जे वाजवून दांडीया सुरु होता. त्यावर कारवाई करण्यास गेलेले रामानंदनगर पोलीस उपनिरिक्षकाला महिलेसह दोघांनी अरेरावी तसेच धक्काबुक्की केल्याचा प्रकार 8 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडला. विशेष म्हणजे यातील एकाला ताब्यात घेतल्यावर दोघांनी पोलीस वाहन अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक कांचन काळे यांच्यासह पोलीस नाईक विजय खैरे, ज्ञानेश्वर कोळी व वाहनचालक संतोष पाटील यांचे पथक 8 रोजी उशीरापर्यंत सुरु असलेल्या सार्वजनिक मंडळाची पाहणी, ते बंद करण्याकामी गस्त घालत होते. पथकाने शिवकॉलनी, पिंप्राळा, खंडेराव नगर, हरिविठ्ठल नगर, रामानंद नगर, काव्य रत्नावली ौक, रोटरी क्लब भवन येथील दुर्गादेवी मंडळे बंद करुन रात्री 11.30 वाजेच्या सुमारास जाकीर हुसेन कॉलनी येथे गेले.
पोलिसांना म्हणाले तुमच्याकडून होईन ते करा
जाकीर हुसेन कॉलनी येथे मॉ नवदुर्गा उत्सव मित्रमंडळातर्फे 11.30 वाजेच्या सुमारास बंद असतांनाही डी.जे. लावुन दांडीया सुरु होता. 10 वाजेची परवानगी तसेच डी.जे. बंदी असल्याने पोलिसांनी विनोद तायडे यांना डी.जे. बंद करुन दांडीया बंद करा असे सांगितले असता, विनोद तायडे याने उलट कर्मचार्याला अर्वाच्च भाषा वापरुन तुमच्याकडून जे होईन ते करा असे सांगितले.
ताब्यात घेताच पोलीस वाहनावर दोघे आडवे
अर्वाच्च भाषा वापरल्याने विनोद तायडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. व पोलीस वाहनात बसवून घेवून जात असतांना विनोदची आई नलीनी तायडे व भाऊ सतीश तायडे यांना आरडाओरड केली व दोघेही वाहनासमोर आडवे झाले. तसेच आम्ही तुम्हाला येथून जावू देणार अशी धमकी दिली. एवढेच नाहीतर नलीनी तायडे यांनी पोलीस उपनिरिक्षक कांचन काळे यांचा हात ओढून माझ्या पोराला सोड नाही तर तुला जावू देणार नाही, असे म्हणत मोठमोठ्याने आरडाओरड केला. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक कांचन काळे यांच्या फिर्यादीवरुन विनोद तायडे, नलीनी तायडे व सतीष तायडे या तिघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तिघांपैकी विनोद तायडे यास पोलिसांनी अटक केली आहे.