डी. वाय. पाटीलमध्ये खाद्यमहोत्सव उत्साहात

0

वार्षिक खाद्य महोत्सवाचे आयोजन

निगडी : ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये कॅरेबियन नाईट फ्लेवर ऑफ आयलँड खाद्य महोत्सव अतिशय उत्साहात पार पडला. 800 पाहुण्यांनी या वार्षिक खाद्य महोत्सवाला भेट दिली. यामध्ये वेगवेगळ्या हॉटेलचे जनरल मॅनेजर, ट्रेनिंग मॅनेजर, शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींसह इनस्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी झालेल्या कॅरेबिन खाद्य महोत्सवाचे उद्घाटन पुना हॉटेललियर असोसिएशनचे उपाध्यक्ष शरण शेट्टी यांच्या हस्ते झाले. हा वार्षिक खाद्य महोत्सवासाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, प्राचार्य हेमंत मर्चंट यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सचिव अभिजित चर्तुवेदी, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते किशोर कदम (सौमित्र), आलोक राजवाडे, सोनाली संखद आदी उपस्थित होते.

महोत्सवाला मोठा प्रतिसाद
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने दरवर्षी खाद्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक वर्षी कार्यक्रमाची वेगवेगळी संकल्पना ठेवण्यात येते. यंदाच्या खाद्यमहोत्सवाची संकल्पना कॅरेबियन बेटांवरील खाद्यसंस्कृती ही होती. या खाद्य महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे मॉकटेल्स, 35 हून अधिक व्हेज आणि नॉनव्हेज व्यंजन, जर्क चिकन, चिकन विंग, कॉर्न फ्रिटर, एम्पानाडास, ब्लॅक बीन सुप, बारबेक्यु चिकन, चना अ‍ॅन्ड पोटॅटो, कॉर्न करी, रोटी, 13 सॅलेडचे विविध प्रकार, कॅरेबियन ब्लेक केके, कि लाईम पाई, स्ट्रॉबेरी मुस आदी प्रकार बनविले होते. आलेल्या अतिथींनी कॅरेबियन, व्यंजने, नृत्य, संगीत, स्पर्धा व लकी ड्रॉ, रंगीबेरंगी, सजावट, कार्निव्हल व्हॅन यांचा आस्वाद घेतला. कॅरेबियन नाईट फ्लेवर ऑफ आयलँड खाद्य महोत्सवास मोठा प्रतिसाद मिळाला.