ताथवडे : येथील डॉ. डी. वाय. पाटील ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये कॅरेबियन नाईट प्लेवर ऑफ आयलँड खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. 23 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती प्रा. अस्मिता पवार यांनी दिली. या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी जागतिक दर्जाचे कॅरेबियन पदार्थ बनविणार असून 35 पेक्षा जास्त डिशेस या महोत्सवात असणार आहे. तसेच खाद्य महोत्सवाचा आनंद लूटत असताना नृत्य, संगीत, मॉकटेल्स आणि रंगीबेरंगी सजावटी आनंद घेता येणार आहे. कॅरेबियन नाईट खाद्य महोत्सव संध्याकाळी सात ते दहा या वेळेत होणार आहे.