तळोदा। तालुक्यातील राजकीय पुढार्यांमध्ये धनपुर धरण आम्ही निधी आणून पूर्ण केले तर आम्ही धरणाचा कामाला सुरु केली असा वाद रंगला आहे. परतू अस्तीत्वात असलेल्या रोझवा , गढीकोठला डॅमच्या देखाभाल दुरुस्ती खर्चा अभावी तलावातील पाणी वाहून जाते आहे. यासमस्येकडे तालुक्यातील राजकीय पदाधिकार्यांचे मात्र दुर्लक्ष झाले आहे. तळोदा तालुक्यात मोजके धरण (डॅम ) आहे. यात गडीकोठडा पांझर तलाव, रोझवा पाझर तलाव साठवण क्षमता ,57. 62 दस लक्ष घनमीटर, पाडळपूर 58.98 द. ल. घनमीटर सिंगसपूर 47.87 द. ल. घनमीटर गढवली 31.37. द.ल. घनमीटर इतकी आहे. धरण असूनही या धरणांचा उपयोग शेतकर्यांना होतांना दिसत नाही. धरणांवर खर्च करण्यात आला आहे. परतु, या धरणांच्या देखभालीकडे देखील लक्ष पुरवावे अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
धनपूर धरणाने शेतकरी आनंदीत
संबंधित विभागाद्वारे वेळवर निधी मिळत नसल्याचा पाढा वाचण्यात येत आहे. धनपूर धरणासाठी सतत 15 वर्ष लढा देवून शासनाने 26 कोटी रू. खर्च करून धरण तयार केले आहे. यावर्षा पासून त्यात पाणी साठवणुक होणार आहे. यामुळे याभागातील शेतीला त्याच्या मोठा फायदा होणार आहे. यामुळे या भागातील शेतकरी आनंदीत आहेत. तर दुसरी कडे रोझवा पांझर तलावाचे पाणी केवळ वेळीच देखभाल दुरुस्ती न झाल्याने यावर्षी देखील शेतीला पुरेसा पाणीसाठा तलावात नसणार या मुळे या भागातील शेतकरी चितेतं आहेत.
क्षमतेपक्षा कमी पाणी साठा
गेल्या 20ते 25 वर्षा पासून अस्तीत्वात आहेत. या प्रकल्पाच्या देखाभाल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने याप्रकल्पांमधून पाणी पाझरत असते. यामुळे याप्रकल्पांमध्ये क्षमते पेक्षा कमी पाण्याचा साठा होतो. यामुळे या भागातील शेतीला पाण्याचा पुरवठा अपूर्ण होत आहे. याबाबत याभागातील शेतकर्यांनी वारंवार तक्रारी करून उपयोग झालेला नाही. आजच्या पारीस्थितीत रोझवा पाझर तलावाचा सांडव्या भितींतून मोठया प्रमाणा पाणी निघत आहे. मागील वर्षींदेखील अशाच पध्दती पाणी निघत होते. शेतकर्यानी तक्रारी केल्या परंतू काही उपयोग झाला नाही. ऐन पावसाळ्यामागील वर्षी नगपाण्याचा साठा शिल्लक राहीला होता. या भागातील भूगर्भातील पाण्याच्यापातळीवर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे या भागातील काही शेतकर्यांनी आपल्या शेतात नवीन कुपनतिका कराव्या लगाल्या आहेत.
राजकीय व्यक्तींकडून दुर्लक्ष
एकीकडे नवीन धरणाचे श्रेय लाटून घेण्यासाठी जणू राजकीय पदाधिकार्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. परंतू जे धरण अस्तीत्वात आहेत त्यांच्या देखभाल दुरुस्ती निधी उपलब्ध करून देण्यास कोणतीही राजकीय व्यक्ती आपला अमूल्य वेळ खर्ची करण्यास तयार नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. यातून शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. नवीन धरण बनविणे गरजेचे असले तरी जुन्या धरण्यांच्या देखभालीकडे देखील लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे शेतकर्यांमधून बोलले जात आहे. धरण बनविण्यासाठी लढा प्रदिर्घ लढा द्यावा लागत असला तरी धरण बनल्यानंतर त्याची देखभाल दुरूस्ती देखील करण्याची गरज आहे.