डेंगू सदृश्य रुग्णांच्या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक.

मुक्ताईनगर प्रतिनिधी – तालुक्यात डेंगू सदृश्य रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज तात्काळ तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राची आढावा बैठक घेत उपायोजना करणे संदर्भात तसेच रिक्त जागा संदर्भात चर्चा केली यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वीरेंद्र कुमार बिराजदार

वैद्यकीय अधीक्षक मुक्ताईनगर रुग्णालय डॉ. योगेश राणे, प्रा आ केंद्र उचंदा

डॉ अमितकुमार घडेकर , प्रा आ केंद्र रुईखेडा ,डॉ संदिप तायडे, प्रा आ केंद्र अंतूर्ली,डॉ रवींद्र सोनावणे प्रा आ केंद्र कुऱ्हा आरोग्य सहायक बाळू जयकर, आरोग्य सहायक विजय पाटील, आरोग्य सहायक ,आरोग्य सहायक सुरवाडे सह शिवसेनेचे दिलीप पाटील ,महेंद्र मोंढाळे, स्विय सहायक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील उपस्थित होते.

 

 

तालुक्यात डेंगू सदृश्य रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे या सर्व परिस्थितीची जाणीव होताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील वैद्यकीय यंत्रणेची आढावा बैठक घेतली या बैठकीत डेंगू विषयी डॉक्टर यांचेकडून सर्व माहिती जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याचे आदेशही दिले तसेच निदान होणे करिता येत असलेल्या अडचणी डॉक्टरांकडून समजून घेत डेंगू सदृश्य तपासणी किट या शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या खिशावर तो अतिरिक्त भार पडत असल्याचे या ठिकाणी डॉक्टर्स यांनी सांगितल्यावर आमदार पाटील यांनी तात्काळ तपासणी किट शासकीय रुग्णालयांना उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी सांगितले.

शासनाने केस पेपर तसेच तपासणी शुल्क, एक्स-रे शुल्क, सर्वत्र माफ केल्याने रुग्णालयात आता रुग्णांची संख्या वाढत आहे परंतु डेंगू सदृश्य तपासणी किट तसेच कर्मचारी व डॉक्टर यांची रिक्त पदे आहेत.आमदार पाटील यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकारी जळगाव आयुष्

प्रसाद यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली व तालुक्यातील तसेच मतदारसंघातील सविस्तर डेंगू विषयीची परिस्थिती सांगितली तसेच तालुक्यात ओपीडी करत असताना रुग्णालयांमध्ये रिक्त असलेली पदांविषयी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करीत लवकरात लवकर पदे भरण्यात यावी याबाबत चर्चा केली तसेच उद्या आरोग्य मंत्री यांच्याशी बैठक घेऊन सविस्तर माहिती घेत रिक्त जागा व वाढत्या डेंग्यू रोगाच्या प्रादुर्भावावर आळा बसविणे बाबत उपायोजना करणे संदर्भात तसेच डेंगू टेस्ट किट संदर्भात देखील चर्चा करणार असल्याची ही यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले.