डेंग्यूची लागण

0

जुन्नर । पिंपळवंडी येथील आरोग्य खात्याच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करणार्‍या कर्मचार्‍यालाच डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्याच कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या आठ तो दिवसांपासून आळेफाटा येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या कर्मचार्‍याला आठ दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यानंतर त्याच्या रक्ताची चाचणी घेतली असता त्यास डेंग्यूची लागण झाल्याचे समजले.