डेंग्यूच्या नियंत्रणासाठी आंतरविभागीय समिती स्थापन

0

पुणे । शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीइतकीच राज्यात डेंग्यूची लागण झाली असून, सर्वाधिक डेंग्यूचे पेशंट पुण्यात असल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. यामुळे डास नियंत्रणासाठी आंतरविभागीय समिती स्थापन करण्याचा प्रयोग पुणे महापालिकेने केला आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेर राज्यात 6 हजार 792 पेशंटना लागण झाली होती. त्यापैकी 33 जणांचा बळी गेला. यंदाच्या वर्षी 6 हजार 894 जणांना लागण झाली असून, आजपावेतो 34 जणांचा बळी गेला आहे. राज्यात सर्वाधिक डेंगीचे पेशंट पुण्यात आहेत. शहरात लागण झालेल्यापैकी 12 जण दगावले आहेत. त्यापाठोपाठ मुंबई शहरात 1 हजार 84 जणांना लागण झाली असून, 17 जण दगावले आहेत. नाशिक शहर जिल्ह्यात 862, सांगली शहर जिल्ह्यात 81 जणांना लागण झाली आहे,’ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शहरात डेंगीच्या पेशंटची संख्या घटली होती. परंतु, यंदा पडलेल्या पावसामुळे पेशंटची संख्या वाढली आहे.नोव्हेंबरअखेर डेंगीचा प्रभाव कमी झाला होता. स्वयंसेवी संस्था, उद्योग, रुग्णालये, डॉक्टर यांची सामूहिक जबाबदारी असते. स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली.