दिघी । येथील भारत मातानगरातील एका महिलेचा डेंग्यूमुळे गुरुवारी (दि. 19) मृत्यू झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरीही महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाकडून डेंग्यूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात नाही, अशी तक्रार वसंत नाथा रेंगडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, भारत मातानगर येथील रहिवासी असलेल्या महिलेचा डेंग्यूसदृश्य आजारामुळे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाने यंदा डेंग्यूबाबत जनजागृती, माहितीचे फ्लेक्स, जाहिराती आढळून आलेल्या नाहीत. आरोग्याचे कर्मचारी डेंग्यूच्या अळ्या तपासणीसाठी घरोघरी पोहोचलेले नसल्याची त्यांनी तक्रार केली आहे.