डेंग्यूमुळे जैताणेत युवकाचा मृत्यु

0

जैताणे। येथील युवकाचा डेंग्यूची लागण झाल्यामुळे मृत्यु ओढावल्याची दुःखद घटना घडली आहे . जीभाऊ बळीराम जाधव यांचा मोठा मुलगा विक्की याला चार-पाच दिवसांपासून ताप येत होता म्हणून त्याला साक्री येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तेथे ही प्रकृतित सुधारणा न झाल्याने त्याला धुळे येथील सेवा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतित सुधारणा होईल असे वाटत असतानाच सोमवारी सकाळी त्याची प्रकृति अधिक खालावली व सात वाजता डेंग्यू मुळे विक्कीचा म्रुत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याने याच वर्षी विज्ञान शाखेतुन बारावीची परीक्षा पास होऊन दहावीच्या आधारे शासकीय आयटीआय मधे प्रवेश मिळविला होता. अत्यंत हुशार व मनमिळाऊ स्वभावाच्या विक्कीचा असा अचानक मृत्यु झाल्याने त्याच्या परिवारासह नातेवाईक व मित्रांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी दुपारी एक वाजता त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.