डेंग्यूमुळे तिघांचा मृत्यू

0

बारामती । सुर्यनगरीतील एका तरुणाचा डेंग्युने मृत्यू झाला आहे. यापूर्वी शहरात दोन महिलांचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतांचा आकडा तीनवर पोहचला आहे.

शहर व परिसरात विशेषत: सूर्यनगरी परिसरात डेंग्यूचा उद्रेक झाला आहे. यंदा भरपूर झालेल्या पावसाने ठिकठिकाणी डबकी साचली होती. तसेच गवतही मोठ्या प्रमाणात आलेले आहे. रिकाम्या जागी गवत आणि डबकी यामुळे तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जवळपास प्रत्येक घरात एक किंवा दोन रूग्ण आढळून येत आहेत. यामुळे लोकांच्या प्रपंचातून मोठा पैसा दवाखान्यासाठी जात आहे. ओंकार हरिदास दहिदुले (वय.25) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. गेल्या आठवड्यात ओंकारला बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी आजाराचे निदानही झाले होते. ओंकारची प्रकृती खालावल्याने त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.