बारामती । डेंग्यूमुळे सटवाजीनगर येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. उमा आनंद सोनवणे (वय 31) असे तिचे नाव आहे.
उलट्या व जुलाब हो असल्याने दोन दिवसांपूर्वी तिला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. माजी नगरसेवक सुधीर (नाना) सोनवणे यांच्या त्या सून होत्या. त्यांच्या मागे सासू, सासरे, पती, दोन मुलगे व मुलगी असा परिवार आहे.