डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लूबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन

0

मुंबई : एस.एल. रहेजा हॉस्पिटल, माहीम व बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता विविध प्रकारच्या पाण्याद्वारे होणारे आजार तसेच डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरेसीस यासारख्या आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगरपालिका जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिराजदार, विभागीय आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता आंबेरकर, विभागीय नगरसेवक मिलिंद वैद्य तसेच फोर्टीस हॉस्पिटलचे सहयोगी, एस.एल. रहेजा हॉस्पिटलचे सीईओ डॉ. बिपीन चेवले उपस्थित होते.

समाजहिताचा हा उपक्रम पुढेही सुरूच राहणार
सामाजिकदृष्ट्या जबाबदार असलेल्या हॉस्पिटलशी आम्ही या उपक्रमासाठी भागिदारी केली आहे, ज्यामुळे समाजाच्या आरोग्यासाठी एकत्रितपणे जनजागृती तसेच भरीव कार्य करता येईल. समाजाच्या हितासाठी आम्ही हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवणार आहे ’, असे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिराजदार म्हणाले. या उपक्रमाबद्दल बोलताना एस.एल. रहेजाचे सीईओ डॉ. बिपीन चेवले म्हणाले की, हे आरोग्यदायी समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक प्रगतिशील पाऊल आहे, जेथे आम्ही मुंबईकरांना सर्वसामान्य आजारांविषयी समजून घेण्यास आणि सक्षम करण्यास मदत करतो. आजाराविषयी मूलभूत लक्षणे ओळखणे, ताबडतोब वैद्यकीय उपचार शोधणे आणि स्वयं औषधोपचार टाळण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे, आपण याबद्दल आपल्या समाजाला संवेदनशील करणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही महानगरपालिकेतच्या अधिकार्यांच्या मदतीने चालवत असलेल्या या उपक्रमाद्वारे समाजातील एका मोठ्या विभागात पोहचण्याची आशा करतो.