डेक्कन एक्सप्रेसच्या धडकेत अज्ञात ठार

0

पिंपरी : डेक्कन एक्सप्रेसच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दापोडी रेल्वे स्थानकाजवळ घडला. दुपारी सव्वा तीन वाजता पुणे स्थानकावरून मुंबईसाठी डेक्कन एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11008) ही गाडी आहे. ही गाडी दापोडी रेल्वे थानकाजवळ आली असता अचानक एक इसम रेल्वे ट्रॅकवर आला. रेल्वेच्या धडकेत तो खाली पडला. जोरदार धडक बसल्याने त्या इसमाचा जागीच मृत्यू झाला.

मृत रेल्वे कर्मचारी?
मृत्यू झालेल्या इसमाची अद्याप ओळख पटली नाही. रेल्वेखाली येऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याने डेक्कन एक्सप्रेस दापोडी रेल्वे स्थानकावर काही वेळ थांबवण्यात आली. तसेच लोणावळ्याहून पुण्याकडे जाणारी लोकल देखील काही वेळ थांबवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत व्यक्ती रेल्वे कर्मचारी असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.