मुंबई । राहूल गांधी यांनी पंतप्रधआन मोदी यांच्या सरकारला आज चांगलेच टीकेचे लक्ष्य केले. ट्वीटरवर त्यांनी डेटा लीक, पेपर लीक आणि चौकीदार वीक, अशी पंतप्रधानांची खिल्ली उडवली आहे.न केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पेपरफुटीवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. व्यक्तीची खासगी माहिती (डेटा) लीक, आधार कार्डची माहिती लीक, सीबीएसईचे पेपर लीक होत आहेत. प्रत्येक गोष्ट लीक होत आहे. कारण या देशाचा ‘चौकीदार’च वीक असल्याची खरमरीत टीका राहुल गांधी यांनी केली आहे. पेपर फुटीमुळे दोन विषयांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे.
आता फक्त एकच वर्ष नंतर सत्ता परीवर्तन ः राहूल गांधी
डेटा लीक, आधार लीक, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे पेपर लीक, निवडणुतीची तारीख लीक आणि आता सीबीएसईचे पेपर लीक. प्रत्येक गोष्ट लीक होते कारण देशाचा चौकीदार वीक आहे, असे ट्विट त्यांनी केले. ‘आता फक्त एकच वर्ष’ असे म्हणत राहुल गांधींनी 2019 मध्ये सत्ता परिवर्तन होईल, केला आहे. सीबीएसईचे दहावीचे गणित आणि बारावीचे अर्थशास्त्र विषयांच्या परीक्षा पुन्हा होणार आहेत. या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅपवर फुटल्याने देशभरात खळबळ उडाली. शेवटी या दोन्ही विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय बोर्डाला घ्यावा लागला.