पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नगरसेवक नामदेव ढाके यांच्या पुढाकाराने या परिसरातील नागरिकांसाठी ओपन जिमची उभारणी करण्यात येत आहे. ओपन जिमच्या कामाला सूरूवात झाली असून लवकरच ओपन जिमच्या माध्यमातून नागरिकांना चांगले आरोग्य मिळवून सक्षम राहता येणार आहे. प्रभागातील शिवनगरी, ओंकार कॉलनी या परिसरात महापालिकेच्या माध्यमातून ओपन जिमचे काम सूरू झाले आहे. तसेच, शाहू उद्यानात देखील ओपन जिम उभारण्यात येत आहे. यासाठी नगरसेवक नामदेव ढाके यांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. नामदेव ढाके यांनी प्रभागाच्या विकासकामांचा धडाका सूरू केला आहे. ओपन जिमचा विशेष करून ज्येष्ठ नागरिक, महिला, युवकांना फायदा होणार आहे. ओपन जिममध्ये एअरवॉकर, सिट-अप स्टेशन, एअर स्विंग, हॉर्स राइडर स्टेशन, स्टीयर स्टेपर, लेग प्रेस, पुल चेअर, व्यायामाची बार, आर्म व्हील, इलेक्ट्रिकल व्यायाम, डबल क्रॉस वॉकर, ट्विस्टर, ब्रिज शिडी व्यतिरिक्त इतर उपकरणे स्थापित करण्याचे आणि डंबेल निश्चित करण्याचेही नियोजन आहे.
या संदर्भात माहिती देताना प्रभागातील नगरसेवक नामदेव ढाके म्हणाले, या धावपळीच्या युगात नागरिकांना व्यायामाचा विसर पडून लोक आजारांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत ओपन जिम सुविधा देऊन या भागातील रहिवाशांचे आरोग्य सुधारण्याकरीता प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्यामध्ये जिम करून मुले आपले आरोग्य चांगले ठेवू शकतील. विशेष म्हणजे, या जिममध्ये व्यायाम करणार्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जिम बनवण्याबरोबरच ओपन जिमची देखभाल व देखभाल करण्याचीही संपूर्ण जबाबदारी महापालिकेची असणार आहे. या ओपन जिमचा रहिवाशांना मोठा फायदा होईल. या जिमद्वारे व्यक्ती आपले शरीर निरोगी ठेवण्यास सक्षम राहिल. हे ओपन जिम सर्वांसाठी खुले असणार आहे. या ओपन जिममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स असतील. जेणेकरून प्रत्येकजण, मुले, महिला किंवा पुरुष, जिममध्ये व्यायाम करून त्यांचे शरीर निरोगी ठेवू शकतील. एअर वॉकर, सीटअप स्टेशन, एअर स्विंग, स्टीयर स्टीपर, हार्स राइडर स्टेपर, लेग प्रेस, पुल चेअर, एक्सरसाइजिंग बार, सीट चेस्ट प्रेस, आर्म व्हील, आल्पिटिकल एक्सरसाइझर, डबल क्रॉस वॉकर, ट्विस्टर, रोइंग मशीन, ब्रिज शिडी, वेट लिफ्टर यांचा असेल. ओपन जिम वर जा, शरीर आणि मन निरोगी करा, असा संदेशही श्री. ढाके यांनी दिला आहे.
प्रभागातील विकासकामांचा धडाका…
नगरसेवक नामदेव ढाके यांनी आपल्या प्रभागातील विकासकामांचा धडाका सूरू ठेवला आहे. ड्रेनेज, रस्ते डांबरीकरण, पाणी पुरवठ्याचे नियोजन, प्रभागातील स्वच्छता याकडे नेहमीच लक्ष केंद्रीत केले आहे. नागरिकांच्या तक्रारी त्वरित मार्गी लावण्याचे नियोजन करण्यावर देखील नगरसेवक ढाके यांनी भर दिला आहे. या भागातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेवून पोलीस चौकीच्या उभारणीसाठी माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या मदतीने पोलीस चौकीची उभारणी करण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. प्रजासत्ताकदिनी या भागातील पोलीस चौकीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविला आहे.