डेडमॅन अंडरटेकरने घेतली 27 वर्षाच्या काळानंतर निवृत्ती

0

फ्लोरिडा । डब्ल्यूडब्ल्यूई मध्ये ‘डेडमॅन द अंडरटेकर ’ अशी ओळख असलेल्या अंडरटेकर याने डब्ल्यूडब्ल्यूई स्पर्धेतून निवृत्ती घेतली आहे.या खेळात 90 च्य दशकातील सर्वाचा फेव्हरेट होता. या प्रसिध्द असलेल्या रेसरल डेडमॅन द अंडरटेकर याने 27 वर्षाच्या काळानंतर निवृत्ती घेतली आहे. रेसलमेनिया 33 मधील रोमन रेन्ससोबत झालेल्या सामन्यात हार पत्कारावी लागली यानंतर त्याने टोपी खाली ठेवून निवृत्ती घेतली. रेसलमेनियाचा मेन इव्हेंट अंडरटेकर आणि रोमम रेन्स यांच्यादरम्यान झाला.त्याचा रेन्सने पराभव केला. मॅचनंतर अंडरटेकर रिंगमध्ये उभे राहण्याचा प्रयत्न करत होता पण त्याची हालत नाजूक होती, चाहतेही अंडरटेकरच्या नावाने ओरडत होते,

रेसलमेनिया 30 मध्ये ब्रॉक लेस्नरने अंडरटेकरला हरवले होते
चाहत्यांच्या डोळ्यातही पाणी होते .थोड्यावळाने अंडरटेकरने आपल्या हातातून ग्लव्स, कोट आणि टोपी उतरवून रिंगच्या मधोमध ठेवली. त्यामुळे डेडमॅनने संन्यास घेतल्याचे स्पष्ट झाले. अंडरटेकरचे म्यूझिक वाजल्यानंतर संपूर्ण एरिनामध्ये काळोख पसरतो आणि अचानक डेडमॅन द अंडरटेकर रिंगमध्ये उभा दिसतो. इतकी वर्ष झाल्यानंतरही अंडरटेकरची ही एन्ट्री दर्शकांना खूप आवडायची. यापुर्वी रेसलमेनिया 30 मध्ये ब्रॉक लेस्नरने अंडरटेकरला हरवले होते . रेन्सकडून झालेला पराभव हा अंडरटेकरचा रेसलमेनियातील दुसरा पराभव ठरला.

23 सामने जिंकले
रेसलमेनियात त्याने केवळ 2 पराभवांचा सामना केला तर तब्बल 23 सामने जिंकले. वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट द्वारा आयोजित रेसलमेनियाचा हा 33 वा इव्हेंट होता. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये झालेल्या या इव्हेटंला 65 हजार लोकांनी लाईव्ह पाहिले. 1990 मध्ये अंडरटेकर डब्लयूडब्लयूईमध्ये आला होता. 23 वेळेस रेसलमेनियाच्या रिंगमध्ये उतरून केवळ 2 वेळेस डेडमॅनला पराभवलाचा सामना करावा लागला.