पिंपरी-चिंचवड : शहरातील रहिवासी असलेले अजित गुप्ते यांची डेन्मार्क देशाचे भारताचे राजदूत (अॅम्बेसेडर) म्हणून नुकतीच नेमणूक झाली आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे त्यांचा आज (सोमवारी) सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
महापालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, जैवविविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, नगरसेविका आरती चोंधे, माई ढोरे, सारंग कामतेकर आदी उपस्थित होते. अजित गुप्ते हे पिंपरी-चिंचवडचे रहिवासी असून, त्यांची डेन्मार्क देशाचे भारताचे राजदूत म्हणून नेमणूक झाली. शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे.