डेबिट कार्डचे शुल्क कमी होणार?

0

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेकडून डेबिट कार्डच्या वापरावरील शुल्क कमी केले जाण्याची शक्यता आहे. शुल्कात तर्कसंगत बदल करण्यात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना दिली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये डेबिट कार्डने होणार्‍या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

मात्र यामध्ये आणखी वाढ करण्याचा सरकारचा मानस आहे. लोक स्वत:च्या खिशावर भार देऊन कॅशलेस व्यवहार करणार नाहीत, असे अनेक तज्ज्ञांनी सरकारला सांगितल्यानेच रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. डेबिट कार्डच्या शुल्कांमध्ये घट करण्याचा किंवा ते पूर्णपणे रद्द करण्याचा रिझर्व्ह बँकेचा मानस आहे.