डॉक्टरांचा कडकडीत बंद

0

मनोर । गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागामध्ये आयुष डॉक्टर वैद्यकीय सेवा पुरवित आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने या सर्व आयुष डॉक्टरांना एनएमसी (नॅशनल मेडीकल कनिशन बील) बिल 2017 अंतर्गत ब्रिज कोर्स देऊन त्यांना शासनाच्या वैद्यकीय सेवेच्या प्रमुख स्त्रोत मध्ये घेण्याचा मानस आहे. हे बिल पास झाल्यास अनेक ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा ही प्रचंड प्रमाणात सुधारेल, याचाच एक भाग म्हणून या बिलाच्या समर्थनार्थ आज डहाणू तालुक्यातील मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ डहाणू यांच्यावतीने एक दिवसीय कडकडीत बंद पाळण्यात आला.

उपजिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन
हे एनएमसी बिल हे बहुमताने व त्वरित पारित होण्याकरिता मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ डहाणूचे अध्यक्ष डॉ. अमित नहार, सेक्रेटरी डॉ. आदित्य अहिरे, उपाध्यक्ष डॉ. अरुण पाटील, डॉ. अजय पाटील, डॉ. अमोल गायकवाड, डॉ. स्मिता खोत, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अनिल देशमुख, डॉ. सोनावणे, डॉ. भंसाली, डॉ. नितीन पाटील, डॉ. अस्वार, डॉ. भोये व तालुक्यातील 65-70 डॉक्टरांच्या वतीने डहाणू उपजिल्हाधिकारी आचल गोयल यांना निवेदन देण्यात आले.