डॉक्टरांचा 6 रोजी मोर्चासह ‘पेन डाऊन’ आंदोलन

0

भुसावळ । आयएमएचे संपूर्ण भारतातील प्रतिनिधी इंडिया गेट ते इंदिरा गांधी स्टेडिअम नवी दिल्ली येथे मंगळवार 6 रोजी मोर्चा काढणार आहेत. त्यानिमित्त संपूर्ण भारतातील डॉक्टरांचे सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेदरम्यान पेन डाऊन आंदोलन आहे. या दरम्यान कोणाताही डॉक्टर कोणतीही औषधी लिहून देणार नाही. वैद्यकिय उपचारातील निष्काळजीपणा व लेखनिक चुकांसाठी फौजदारी कार्यवाही करू नये, ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कमाल भरपाईची मर्यादा ठरवावी, डॉक्टरांच्या हॉस्पीटलच्या बाबतीत सर्व प्रकारच्या नोंदणीसाठी एकाच ठिकाणी एक खिडकी व्यवस्था असावी, सरकारच्या प्रत्येक आरोग्य विषयक समितीमध्ये आयएमएचा प्रतिनिधी असावा, वेगवेगळ्या उपचार पध्दतीचे अशास्त्रीय मिश्रण करु नये आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.