तळेगाव आरोग्य केंद्रातील डॉ.प्रमोद सोनवणेच्या कार्याचे समाजातून कौतुक
चाळीसगाव- सरकारी रुग्णालये व त्यातून मिळणार्या सेवेविषयी सर्वसामान्य नागरीक नाखुष असल्याचा एरव्ही समज असला तरी तालुक्यातील तळेगावचे आरोग्य केंद्र त्यास नेहमीच अपवाद ठरले आहे. त्यातच शुक्रवारी नवजात अर्भकाने आईच्या पोटात शी केल्यानंतर ती त्याच्या पोटात गेली मात्र डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाने या बालकाला जीवदान मिळाले तर बाळ रडताच माता गहिवरली व डॉक्टरांना दिलासा मिळाला.
प्रयत्नांती परमेश्वर ; अर्भक रडताच दिलासा
तळेगावातील विवाहिता कांचन प्रदीप गोरे (28) या आरोग्य केंद्रात द्वितीय प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. शुक्रवारी त्यांची प्रसुती झाली मात्र नवजात बाळाने मातेच्या पोटात शी करून ती गिळल्याने बाळ जन्मताच न रडल्याने डॉक्टरांची चिंता वाढली. बाह्यरूग्ण विभागात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे यांनी आरोग्य सेविका शीतल सोळुंके यांच्या मदतीने बाळाला तत्काळ वार्मर कक्षात नेत आवश्यक ते महत्वाचे उपचार करताच अर्भक रडल्याने उपस्थितांना दिलासा मिळाला तर मातेलाही गहिवरून आले. मरणासन्न अवस्थेतील त्या बाळाला धोक्याबाहेर आणल्याचा आनंद हा शब्दात वर्णन करण्याजोगा नाही मात्रा हीच जनसेवा पुण्य मिळवून देते*, अशी भावना वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी व्यक्त केली.
अधिक उपचारार्थ अर्भकास हलवले
आरोग्य सेविका एल.डी.पवार यांनी यांनी 108 रुग्णवाहिकेद्वारे अर्भकास अधिक उपचारासाठी बालरोग तज्ज्ञांकडे हलवले आहे. त्यासाठी डॉ.नितीन चव्हाण, राकेश पाटील, विजय रणदिवे, गटप्रवर्तक ज्योत्स्ना शेलार यांनी सहकार्य केले.