जळगाव : डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ऑनलाईन औषधींची विक्री केल्याचा प्रकार उघड झाला असून जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मेशो वेबसाईटवरून ऑनलाईन औषध विक्रीचा प्रकार उघड झाला आहे.
अनधिकृतपणे औषधांची विक्री
बेकायदेशीपणे डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ‘मेशो’ या ऑनलाईन वेबसाईटसह इतर वेबसाईटवर औषधींची विक्री करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ मोरे यांनी कर्मचार्यासह संबंधित प्रकाराची चौकशी केली. यात जळगाव शहरातील शिवकॉलनीतील अमोघा हाईटस्, मुंदडानगर येथील फ्लॅट क्रमांक 25 येथून ऑनलाईन औषधांची विक्री केली जात असल्याचे समोर आले. 29 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान विविध औषधांची विक्री केल्याचेही समोर आले. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ मोरे यांनी सोमवार, 2 मे रोजी याप्रकराबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार मेशो ऑनलाईन पोर्टलसह इतर वेबसाईटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलि उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.