वरणगाव। तळवेल येथील सागर पाटील यांचा मुलगा दुर्गेश (वय 10) हा अंगणात खेळत असतांना अचानक सर्पदंश झाल्याने त्याला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यावर वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी व बालकाच्या परिवाराने वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या हालगर्जी पणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.