डॉक्टरांच्या संपामुळे भुसावळ विभागात रुग्णांचे हाल

0

रावेर/भुसावळ- नॅशनल मेडीकल कमिशन विधेयकाविरोधात डॉक्टरांनी मंगळवारी दवाखाने बंद ठेवत काळा दिवस पाळल्याने भुसावळ विभागात रुग्णांचे चांगलेच हाल झाले.

भुसावळात कडकडीत बंद
भुसावळ येथील इंडियन मेडीकल असोसिएशनने संपाला पाठींबा दिला असून शहरातील सर्व दवाखाने बंद ठेवण्यात आले असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ.दीपक जावळे, खजिनदार डॉ.प्रसन्ना जावळे, सचिव डॉ.मिलींद एम.पाटील यांनी कळवले आहे.

रावेर शहरातही दवाखाने बंद
नॅशनल मेडिकल कौन्सील विधेयकाविरोधात पुकारलेल्या संपात रावेरच्या डॉक्टरांनी सहभाग घेत दवाखाने बंद ठेवल्याने रुग्णांचे हाल झाले. डॉ.पी.टी.पाटील, डॉ.आर.एन.पाटील, डॉ.संदीप पाटील. डॉ.प्रवीण चौधरी, डॉ.डिगंबर पाटील, डॉ.योगेश पाटील, डॉ.गुलाबराव पाटील, डॉ.चैताली चौधरी, डॉ.अमिता महाजन, डॉ.मिलिंद वानखेडे यांच्यासह अनेकांचा सहभाग होता.