डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जळगावात रुग्णाचा मृत्यू : नातेवाईकांचा आरोप

जळगाव : जळगाव जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू ओढवला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अवचीत काळु तायडे (46, रा.समतानगर) हे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल असताना सोमवार, 4 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

नातेवाईकांनी केले गंभीर आरोप
अवचित काळे हे मजुरी काम करतात. सोमवारी दुपारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. डाव्या बाजूने पॅरालिसिस सारखा त्रास जाणवत असल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी दिवसभर कुठलेही उपचार केले नाही तसेच लक्षही दिले नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अवचित काळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयताचे जावई सुनील पवार, भाचा विकास अडकमोल, पुतण्या उत्तम तायडे यांनी केला आहे. संबंधित डॉक्टर तसेच कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणीही अवचित यांच्या नातेवाईकांनी केली. मयत अवचित काळे यांच्या पश्चात पत्नी शारदा, मुलगा राहुल तसेच विवाहित मुलगी असा परीवार आहे.