डॉक्टरांनी जेनेरिक औषधांना प्राधान्य द्यावे

0

मुंबई । महापालिका रुग्णालयातील रुग्णांना बाहेरची औषधे लिहून देताना डॉक्टरांनी विशिष्ट औषधी कंपन्यांच्या औषधांऐवजी केवळ जेनेरिक औषधे लिहून द्यावीत, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका संगीता शर्मा यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे.

पालिकेची रुग्णालये आणि आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांना सध्या उपलब्ध असलेली औषधे विनामूल्य दिली जातात. जी औषधे उपलब्ध नसतात ती त्यांना बाहेरून आणण्यास सांगितले जाते. परंतु, बाहेरील औषधांमध्ये विशिष्ट कंपन्यांची नावे दिली जातात. मात्र, ती महाग असल्याने नागरिकांना परवडत नाहीत. त्यामुळे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी जेनेरिक औषधेच लिहून द्यावीत, असे निर्देश कार्यरत असलेल्या डॉक्टरांना द्यावेत, असे त्यांनी ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे.