नागपूर । डॉक्टरांवरील हल्ले हे डॉक्टर-रुग्ण बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे. कायद्याबरोबर रुग्णाबरोबरच्या संवादाला महत्त्व पाहिजे. परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे डॉक्टरांना संवाद साधणे शक्य होत नाही. विशेषत: अतिदक्षता विभागातील डॉक्टरांना हीच बाब अडचणीची जाते. संवाद नसल्याने गैरसमज होऊन वादाला तोंड फुटते. म्हणूनच डॉक्टरांनी नातेवाईकांशी संवाद सांभाळावा, असे आवाहन सेवासुश्रुषातज्ज्ञ डॉ. अतुल कुळकर्णी यांनी येथे केले.
गंभीर रुग्णांच्या आहाराचेही नियोजन आवश्यक
डॉ. सुभल दीक्षित यांनी अतिदक्षता विभागातील रुग्णांच्या पोषक आहारावर लक्ष वेधले. ते म्हणाले, गंभीर रुग्णांवर उपचार करताना त्याच्या आहाराचेही नियोजन करणे आवश्यक आहे. तोंडावाटे आहार घेणारे रुग्ण लवकर बरे होतात, असेही ते म्हणाले. डॉ. सुधीर भावे यांनी रुग्णाच्या आजाराची, उपचाराची व मृत्यूची माहिती देताना नातेवाईकांशी साधला जाणारा संवाद यावर भर दिला. रुग्णाचे नातेवाईक कुठे ‘अॅग्रेसीव्ह’ होतात, त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल, याची माहिती दिली. डॉ. निखील बालंखे यांनी अध्यक्षपदाची तर डॉ. आशिष गांजरे यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. रुग्णाला वाचविण्याचा व कौशल्य पणाला लावण्याचा ताण डॉक्टरांवर असतोच, त्याचवेळी देवदुतासारखे वाटणारे डॉक्टर समाधानकारक उत्तर देत नसतील तर रुग्णांच्या नातेवाईकांचा गैरसमज वाढतो. या कसोटीच्या काळात त्यांना डॉक्टरांकडूनच खरा दिलासा अपेक्षित असतो म्हणून भावनिक गुंत्याचा पेच जटील बनू शकतो.