डॉक्टरांवरील हल्ले टाळण्यासाठी परिषद

0

ऍड.उज्ज्वल निकम होणार सहभागी

हडपसरः असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटस पुणे विभागाच्या वतीने रविवारी(दि.25) एएमसी मिलकोन मीडिया लीगल कॉनफ्ररन्स ही एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले, कारणे व उपाययोजना हे या परिषेदेचे वैशिष्ट्य आहे. या विषयी माहिती देताना, डॉ. दिलीप माने म्हणाले, सुझलॉन मगरपट्टा येथे होणार्‍या या परिषदेत पद्मश्री ऍड.उज्ज्वल निकम, ससूनचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाला पोलीस उपायुक्त रवींद्र निकम सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेत डॉ.अनुराधा जाधव, डॉ.विजय पवार, डॉ.अमर शिंदे आदी उपस्थित होते.

रुग्णालयांशी संबंधित अडचणी, तत्काळ वैद्यकीय मदत, हल्ले झाल्यास मनुष्यबळ, संघटित रहावे, डॉक्टरांना प्रशिक्षण असे विविध उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून करीत असल्याची माहिती डॉ. चेतन म्हस्के, यांनी दिली. या परिषदेमध्ये हडपसर व पुण्यातून मोठ्या संख्येने डॉक्टर सहभागी होणार आहेत