डॉक्टरांवर हल्ला करणार्‍यांवर अजामीनपत्र गुन्हा

0

नवी दिल्ली । डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्रातील मोदी सरकारने नवा अध्यादेश काढला आहे. त्यानुसार डॉक्टरांवर किंवा आरोग्य कर्मचार्‍यांवर झालेले हल्ले करणार्‍यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. शिवाय दोन लाख रुपयपर्यंत दंडाचीही तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.