डॉक्टरांसह पालिका अभियंता पारोळ्यानजीक भीषण अपघातात ठार

Horrific accident near Parola : Municipal Engineer Killed Along With Doctor पारोळा : पारोळापासून काही अंतरावरील विचखेडा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात पारोळा पालिकेचे अभियंता आणि डॉक्टर ठार झाले. सोमवारी सकाळी सात वाजता हा अपघात कॅप्सूल टँकर व कारमध्ये घडला.

परतीच्या प्रवासात क्रुर काळाचा घाला
मृतांमध्ये पारोळा नगरपालिकेचे अभियंता कुणाल सौपुरे (35, रा. गोंधळ वाडा, पारोळा) आणि डॉ.निलेश मंगळे (35 रा.डी.डी.नगर, पारोळा) यांचा समावेश आहे. या अपघातात संदीप पवार (37, रा.आर.एल.नगर, पारोळा) हे जखमी झाले आहेत. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने तिघे मित्र मुंबई येथे गेले होते व परतीच्या प्रवासात पारोळ्यापासून काही अंतरावर असतानाच काळाने घाला घातला. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली.