जळगाव । येथील भास्कर मार्केटजवळील गोदावरी हॉस्पीटलतर्फे डॉक्टर दिनानिमीत्त दि 1 जूलै पासून मोफत कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 15 जूलैपर्यंत दरोरोज दुपारी 4 ते 7 या वेळेत हे शिबिर आयोजित केले असून पांढरे पाण्याचा त्रास,शारीरीक संबंधानंतर होणारा रक्तस्त्राव,अनियमित रक्तस्त्राव,मासिक रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्त्राव, ओटीपोटात दुखणे, स्तनामधील गाठी, जनन अंगावर खाज येणे इ लक्षणे असलेल्या महिला रूग्णांसाठी पॅप स्मिअर,मॅमोग्राफी,गर्भाशयाची तपासणी कोलपोस्कोपीव्दारे मोफत करण्यात येणार आहे. शिबिरात डॉ वर्षा पाटील, डॉ श्रीराम कुळकर्णी,डॉ संजय पवार, डॉ प्रिती सोनवणे, डॉ प्राजक्ता नारखेडे इ स्त्रीरोग तज्ञ तपासणी करणार आहे. गेल्या 25 वर्षापासून विविध शिबिराच्या माध्यमातून रूग्णसेवेत असणा-या गोदावरी हॉस्पीटल भास्करमार्केट जवळ जळगाव येथे हे शिबिर आयोजीत केले असून जास्तीत जास्त महिला रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केले आहे.
कॅन्सर आजारावर नियंत्रणासाठी शिबिर
भारतात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार दर वर्षी दिड लाख महिलामध्ये स्तनांच्या कॅन्सरचे निदान होउन 50 टक्के महिला जिव गमावतात तर 1 लाख महिला रूग्णांमध्ये गर्भाशयाच्या तोंडावरील कॅन्सरचे निदान होत असते. 30 वर्षानंतर एकदा तरी पॅपस्मॅअर प्रत्येक महिलेले करून घेणे गरजेचे आहे. यामुळे कर्करोगापासून बचाव होउ शकतो.
यासाठी या शिबिराचे आयोजन केले असून जास्तीत जास्त महिलांनी तपासणी करून घ्यावी जेणेकरून या संभाव्य धोक्यापासून बचाव होउ शकेल असे प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ वर्षा पाटील यांनी सांगीतले.