विधानसभा युवा सेनेतर्फे राबविला उपक्रम
तळेगाव दाभाडेः रूग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे व्रत मानून डॉक्टर रूग्णांना अहोरात्र नवजीवन देत असतात. अशा मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील डॉक्टरांचा मावळ विधानसभा युवा सेनेच्यावतीने सन्मान करण्यात आला. डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. रूग्णांसाठी आपली सेवा अखंड चालू ठेवणार्या मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील डॉक्टरांचा युवा सेना संपर्कप्रमुख, सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेच्यावतीने डॉक्टर्स डे निमित्त सन्मान करण्यात आला. शुभेच्छा देण्यात आल्या. कार्ला येथील ग्रामीण भागातील 30-40 गावांसाठी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पोळ मॅडम, मळवली येथील डॉ. गिरवले, डॉ. पांडे, डॉ. भावसार मॅडम, कार्ला येथील डॉ. काळे, वाकसई येथील डॉ. सुत्रावे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, वेहेरगाव शाखाप्रमुख कैलास पडवळ, वाकसई शाखा अधिकारी रोशन येवले, दहिवली शाखा अधिकारी शुभम मावकर, अक्षय हुलावळे, निखिल कांबळे, मंगेश शिंदे, अमोल इंगवले, गिरीश हुलावळे, आदेश हुलावळे, सागर सुतार, गणेश कुंभार, सौरभ जंगम उपस्थित होते.