शेंदुर्णी । पुणे येथील डॉ.विजय चौधरी (वय 50) आणि डॉ.वैशाली चौधरी (वय 44) हे दांपत्य ‘बेटी बचाओ बेटी पढाओ, स्त्री भृण हत्या, जल है तो कल है’ या विषयावर जनजागृती करण्यासाठी स्वखर्चाने 6 फेब्रुवारीपासुन भारत भ्रमणसाठी मोटरसायकलवर निघाले आहेत. अद्यापपर्यंत 21 हजार किमीपर्यंत 29 राज्यांमध्ये प्रवास झाला आहे. 9 मे रोजी पुणे येथे प्रवास थांबणार आहे. डॉ.वैशाली चौधरी यांचे माहेरे शेंदुर्णी असल्याने प्रवासादरम्यान येथे आले असता गावातील नागरिकांनी त्यांचा नागरी सत्कार केला. डॉ.चौधरी यांनी मार्गदर्शनात सांगीतले की, स्त्री भृणहत्त्या हि गंभीर समस्या आहे. बंदी असतांना देखील आमच्यातील कलंकीत डॉक्टर हे घृणकृत्य करीत आहे. सापडल्यानंतर त्यांना कायद्याने शिक्षा होतेच परंतु स्त्री भृण हत्या आणि लिंग परीक्षण करणार्या फक्त एका मायबापाला शिक्षा झाल्यास लिंगभेद आणि स्त्री भृण हत्याकायमस्वरूपी संपुष्टात येतील.
तसेच, त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवीत असलेल्या गावात ब्लड गृप कॅम्प घेवून त्याची नोंद स्वतःकडे ठेवली आहे. आता ते स्वतःची ब्लड गृपची वेबसाईट तयार करीत आहेत जणे करून रक्त लागल्यास त्वरीत संपर्क साधुन उपलब्ध करता येईल. त्यामुळे शोधाशोध होणार नाही. याआधी सायकलवर भ्रमंती करून एड्स जनजागृती केली आहे. डॉ.विजय चौधरी आणि डॉ.वैशाली चौधरी हे पुण्यात वैद्यकीय व्यवसाय करतात. डॉ. वैशाली चौधरी (पाटील) ह्या येथिल माजी मुख्याध्यापक एस. बी. पाटील सर आणि कवियत्री रमा पाटील यांच्या कन्या आहेत. आणि डॉ. विजय चौधरी हे मुळचे केकतनिंभोरा ता-जामनेर येथिल रहिवासी आहेत. सध्या पुणे येथे वैद्यकीय
व्यवसाय करतात.
29 राज्ये आणि त्यांच्या राजधान्या
पुणे, गोवा मार्गे कन्याकुमारी मार्गे दिल्ली मार्गे मध्य प्रदेश मधुन महाराष्ट्रात परतीच्या प्रवास असे एकुण 29 राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्यांमध्ये 21 हजार किमीचा प्रवास करून प्रचार आणि प्रसार करीत आहेत. रोज चारशे ते पाचशे किमीचा प्रवास करीत आहेत. स्वखर्चाने जनजागृतीसाठी भारत भ्रमण 21 हजार किमीचा भारत भ्रमण करून जनजागृतीसाठी कोणाचीही मदत न घेता स्वखर्चाने प्रवास आणि राहाण्याचा खर्च करीत आहेत. अद्यापपर्यंत पाच लाखांपर्यंत खर्च झाला आहे. रोजचा पाच ते सहा हजारांपर्यंत पेट्रोल, रहाणे इतर असा प्रवास त्यांना येत आहे.
6 फेब्रुवारीपासून प्रवासास सुरुवात
डॉक्टर श्री व सौ चौधरी हे पेशाने डॉक्टर असल्याने व्यवसाय करीत असतांना आलेल्या अनुभवा वरून आजदेखील मुलांना महत्व दिल्या जात असल्याचे त्यांना अनुभवयास मिळाले. त्यामुळे समाजात स्त्री भृण हत्या आणि बेटी बचाओ बेटी पढाओ बाबतजागृती करणे महत्वाचे असल्याने त्यांनी भारत भ्रमण करण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांपासून प्रवासात आहेत.
विद्यार्थ्यांनी शपथ घेतली
या दरम्यान दिल्ली येथे मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकरांची भेट घेतली. जवाई आणि मुलीच्या कामगीरीबाबत शेंदुर्णीकरांनी केले कौतुक डॉ. वैशाली चौधरी यांचे माहेर तसेच शिक्षण येथे झालेले असल्याने त्यांनी प्रवासादरम्यान जन्मगावी भेट देण्यासाठी आले असता माहेर वाशियांनी अभिमानपर नागरी सत्काराने भारावून गेल्या. तसेच अनुभव सांगतांना उपस्थीतांच्या अंगाला शहारे येत होते. आणि अभिमानाने डोळे पाणावले होते. प्रवासाचा उद्देश साध्य करण्यासाठी गाठीभेटी बाजुला ठेवून सरळ विद्यालय गाठले आणि विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ आणि जल है तो जीवन है ची शपथ घेतली. धुळे मार्गे नाशिकसाठी मार्गस्त झाले .